Fish On Railway Track: मुंबईत (Mumbai) गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात पाणी साठले असून काही ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुंबईतील विविध भागात रात्रीपासूनचं पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली. मुंबईतील वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी या ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
जोरदार पावसामुळे शहारातील विविध स्थानकावर पाणी साचले आहे. परळ स्थानकावर (Parel Station) साचलेल्या पाण्यात मासे आढळले आहेत. यासंदर्भात एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित केले आहे. (हेही वाचा - IAF Aircraft for Sale on OLX: अलीगढ़ मुस्लिम युनिव्हर्सिटीला दिलेले वायुसेनेचे विमान OLX वर 9.99 कोटींना विक्रीसाठी उपलब्ध; विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण)
परळ स्थानकात माशांचा टँक तयार झाला आहे. स्थानकात साचलेल्या पाण्यात माशांनी आक्रमण केलं आहे. साचलेल्या पाण्यात मासे सापडल्याने प्रवाशांनी चिंता व्यक्त केली आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे माशांना या पाण्यात मुक्त संचार करता येत आहे. याआधी स्थानकातील पाण्यात मासे आढळले नव्हते.