महाराष्ट्रसह (Maharashtra) संपूर्ण देशात करोना विषाणूने थैमान घातले असून करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर संचारबंदी करण्यात आली आहे. सगळे व्यापार उद्योग बंद असताना असताना ठाणे (Thane) जिल्ह्याला हादरुन टाकणारी घटना उघडकीस आली आहे. भिवंडी (Bhiwandi) येथील राहनाळ गावातील (Rahnal village) एका केमीकल गोदामाला (Fire breaks out at a chemical godown) आग लागल्याने नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आग विझवण्यासाठी सहापेक्षा अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्याचे समजत आहे. यामुळे मोठी आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत एएनआय वृत्त संस्थेने माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे, ही आग कशामुळे लागली, याची कारण अद्याप अजूनही अस्पष्ट आहे.
कोरोना विषाणवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. यातच भिवंडी तालुक्यात एका केमिकल कंपनीला आग लागली आहे. भिवंडी तालुक्यात आग लागत असल्याच्या अनेक घटना सतत आपल्या कानावर पडत आहेत. यामुळे ठाणे शहरात राहणाऱ्या लोकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाली आहे. हे देखील वाचा- Lockdown: राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत कलम 188 नुसार 95 हजार 678 गुन्ह्यांची नोंद - अनिल देशमुख
एएनआयचे ट्वीट-
Maharashtra: Fire breaks out at a chemical godown in Bhiwandi Rahnal village in Thane district. More than six fire tenders have been pressed into action to put off the fire. pic.twitter.com/eFlMRLlQVG
— ANI (@ANI) May 6, 2020
औरंगाबाद मध्ये तेलाच्या गोदामाला आग; कोणतीही जीवित हानी नाही - Watch Video
याआधी भिवंडी तालुक्यातील भिवंडी तालुक्यातील राहनाळ गावातील कांचन कंपाऊंडमधील एका कोमच्या गोदमला ही भीषण आग लागली होती. या गोदामात कापड बनवण्यासाठी लागणारे ताग्याच्या कोमचा मोठ्या प्रमाणात साठा होता. मात्र, आग लागल्याने संपूर्ण गोदाम जळून खाक झाले होते. तसेच आगीपासून निघणाऱ्या धुरामुळे गावातील नागरिकांना डोळ्यात चुळचुळणे, श्वसनासाठी त्रास सहन करावा लागला होता. भिवंडी अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने रात्री उशिराने ही आग विजवण्यात आली होती.