Fire breaks out at Gokul Shirgaon MIDC | (Photo Credit - You Tube)

कोल्हापूर (Kolhapur ) येथील गोकुळ शिरगाव एमआयडीसी (Gokul Shirgaon MIDC) परिसरातील एका कंपनीला भीषण आग (Fire breaks out at Gokul Shirgaon MIDC लागली आहे. आग इतकी भीषण आहे की, संपूर्ण कंपनी आगीच्या भक्षस्थानी पडल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीची व्याप्ती पाहता आणखीही गाड्या घटनास्थळी पाचारण केल्या जात आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांचे बंबच्या बंब खाली करण्यात येत आहेत.

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील ज्या कंपनीला आग लागली ती कंपनी केमीकल कंपना आहे. त्यामुळे केमीकलचा स्फोट होऊन ही आग आणखी भडकली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये ही कंपनी ज्या ठिकाणी आहे त्या कंपनीच्या आजूबाजूलाही खेटून इतर कंपन्या असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. (हेही वाचा, Nandurba: नंदुरबार जिल्ह्यातील करणखेडा गावाजवळ व्यापारी संकुलाला आग, तीन दुकाने जळून खाक)

व्हिडिओ

दरम्यान, औद्योगीक वसाहतींमध्ये कंपन्यांना आग लागण्याच्या घटना पाठिमागील काही दिवसांपासून सातत्याने घडताना पाहायला मिळत आहेत. नाशिक एमआयडीसीतील जिंदाल कंपनीला नुकतीच आग लागली होती. जिंदाल कंपनीच्या बॉयलरचा स्फोट होऊन ही आग भडकली होती. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात कोल्हापूरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीत कंपनीला आग लागली आहे. त्यामुळे एमआयडीसी परिसरातील कंपन्यांची सुरक्षा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.