Fire at Pharma Company In Raigad: रायगडमधील फार्मा कंपनीला आग, 5 जण जखमी
Fire (PC - File Image)

Fire at Pharma Company In Raigad: रायगड जिल्ह्यातील एका फार्मास्युटिकल कंपनीला शुक्रवारी आग (Fire) लागल्याची घटना घडली. या आगीत पाच जण जखमी झाले. महाड एमआयडीसी परिसरातील कंपनीत सकाळी 10.30 च्या सुमारास ही आग लागली. त्यानंतर आवारातील रसायने असलेल्या ड्रमचा स्फोट झाला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. घटनेच्या वेळी कामगार कारखान्यात होते. त्यापैकी पाच जण गंभीर भाजले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, दुसर्‍या एका घटनेत, उपनगरीय घाटकोपर (पूर्व) येथे गुरुवारी दुपारी एका 11 मजली निवासी इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेसह दोन जण किरकोळ भाजले. एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, उपनगरातील पंतनगर भागात 'सह्याद्री' या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये दुपारी 1.15 च्या सुमारास आग लागली. (हेही वाचा - Pune Fire News: पुण्यातील गर्ल्स हॉस्टेलला आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही)

अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी सुमारे 30 मिनिटे चाललेल्या ऑपरेशननंतर आग विझवली. या आगीचे कारण तात्काळ कळू शकले नाही. ही आग चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, लाकडी फर्निचर आणि कपड्यांपुरती मर्यादित होती.

या घटनेत एक 37 वर्षीय पुरुष आणि 36 वर्षांची एक महिला, किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या नागरीक संचालित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी, मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपरजवळ असलेल्या टिळक नगरमधील 14 मजली निवासी टॉवरमध्ये आग लागली होती. परंतु, या आगीत कोणीही जखमी झाले नाही.