Mumbai Kanjurmarg Fire | (Pic Credit - ANI)

मुंबई शहरातील कांजूरमार्ग (Mumbai kanjurmarg Fire) परिसरात असलेल्या अवजड औद्योगिक वसाहत येथे लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले आहे. अवजड औद्योगित वसाहतीत सॅमसंगच सर्विस सेंटरमध्ये ( Mumbai kanjurmarg Fire) सोमवारी रात्री 8.45 वाजता ही आग भडकली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सुमारे 18 ते 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवळपास तीन तास अथक प्रयत्न केल्यावर ही आग आटोक्यात आली. दरम्यान, आग आटोक्यात आली तरी कुलींगचे काम मध्यरात्री उशीरापर्यंत सुरु होते. आज (मंगळवार, 16 नोव्हेंबर) सकाळीही कुलींगचे काम सुरु असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, या आगीमध्ये वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली. अग्निशमन दल आणि स्थानिकांच्या सतर्कतेनुळे जीवितहानी टळली. दरम्यान, सॅमसंग कंपनीचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सॅमसंग सर्विस सेंटरमध्ये असलेले साहित्य त्याचसोबत या सेंटरच्या शेजारीच असलेल्या सफोला तेल गोडाऊनचेही मोठे नुकसान झाले. गोडाऊन आणि सॅमसंग सेंटरमधील सर्व माल जळून खाक झाल्याचे समजते.  सॅमसंग सर्व्हिस सेंटर आणि सफोला तेल गोडाऊन या आगीत जळून खाक झाले. (हेही वाचा, Earthquake in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीताचे वातावरण)

ट्विट

आगीच्या कारणाचा तपास सुरु आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या स्थानिक माहितीनुसार शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची प्रथमिक माहिती आहे. कांजूरमार्क झोन सातचे डीसीपी प्रशांत कदम यांनी माहिती देताना सांगितले की, आम्हाला रात्री 9 च्या सुमारास माहिती मिळाली की मुंबईतील कांजूरमार्ग पूर्व येथील सॅमसंग सर्व्हिस सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. त्यानंतर आम्ही तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिक लोकांना स्थलांतरित करुण तातडीने बचाव कार्य सुरु केले.