मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणास बसणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तुर्तास आपला निर्णय बदलला आहे. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) निकालानंतर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसणार होते. मात्र, अंतरवाली सराटी गावातूनच त्यांना विरोध होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गावातील उपसरपंचांसह 70 जणांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जरांगेंच्या आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचे म्हटले. त्यानंतर, आता जरांगे यांनी तुर्तास आपले आंदोलन स्थगित केले आहे. (हेही वाचा -Lok Sabha Election Result 2024: उद्या, 4 जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून 48 मतदारसंघात मतमोजणी सुरू; चोख पोलीस बंदोबस्त, 14,507 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती)
मनोज जरांगे यांच उद्याच उपोषण स्थगित केले असले तरी ते 8 जून रोजी उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे, आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल केले जातील, म्हणून सावध भूमिका घेत जरांगेंनी उद्याचं आंदोलन स्थगित केल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे यांनी 4 जूनपासून उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे, उद्या 4 जूनला मनोज जरांगे उपोषणस्थळी जाऊन पुन्हा उपोषणाला बसतील, अशी चर्चा होती. तत्पूर्वीच, गावकऱ्यांनी जरांगेंच्या उपोषणाला विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले आहे. प्रशासनने या उपोषणास परवानगी देऊ नये, गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याने उपोषणास परवानगी देऊ नये अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली आहे.