Lok Sabha Election Result 2024: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून, या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील 48 मतदार संघात मंगळवारी 4 जून 2024 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे. राज्यातील 48 मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण, 14,507 अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण 289 हॉलमध्ये 4,309 मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)