Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. राजकीय पक्ष निवडणूक प्रचारात सर्व ताकद पणाला लावत आहेत. यावेळी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध पक्ष आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. आता भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांना दिलेल्या चार जागा जाहीर केल्या आहेत. या जागांवर मित्रपक्ष आपले उमेदवार उभे करतील. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील चार जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेतला होता.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कलिनामधून, युवा स्वाभिमान पक्ष बडनेरामधून, राष्ट्रीय समाज पक्ष गंगाखेडमधून आणि जन सुराज्य शक्ती पक्ष शाहूवाडीतून उमेदवार उभा करणार आहे. (हेही वाचा: NCP-SCP 4th Candidate List: शरद पवारांकडून चौथी उमेदवार यादी जाहीर; काटोल मधून Anil Deshmukh ऐवजी त्यांचा मुलगा Salil Deshmukh उतरणार रिंगणात)
Maharashtra Assembly Elections 2024:
#MaharashtraElection2024 | BJP releases a list of four constituencies that it is sharing with its allies.
Union Minister Ramdas Athawale-led RPI(A) to filed candidates from Kalina. pic.twitter.com/uUywoX4IOH
— ANI (@ANI) October 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)