Electricity Price Increase: महावितरणकडून वीजदरवाढ; आजपासून नवे दर लागू
Electricity | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नव्या आर्थिक वर्षात महावितरणने वीज दरवाढीचा (Electricity Price) शॉक दिला आहे. राज्याचा आजपासून नवे वीज दर लागू करण्यात आले आहेत. वीज बिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षीही महावितरणने वीज दरवाढीचा झटका दिला होता. एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी विजपुरवठा ठप्प होत असताना अशातच महाविरणाने वीज दरवाढीचा घोषणा केल्याने विज दरवाढीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.  (हेही वाचा - अंबरनाथ, बदलापुरात वीज पुरवठा ठप्प, आठवडाभरात तिसऱ्यांदा वीज खंडित झाल्याने नागरीक हैराण)

वर्षाला दरवाढ होत असल्याने महावितरकडून ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. नवीन आर्थिक वर्ष आजपासून सुरू होत असून 1 एप्रिलपासूनच हे नवे वीज दर लागू होतील. याचबरोबर केंद्राकडून अनेक नियमात बदल करण्यात आले आहेत. वीजबिलात सरासरी 7.50 टक्क्यांची वाढ होणार असून, स्थिर आकारातही 10 टक्के दरवाढ करण्यात आली आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरणकडून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

महावितरणासोबतच टाटा वीज कंपनीचा दरवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. टाटा कंपनी सोबत इतर विज पुरवठा करणाऱ्या कंपन्याही वीज दरात वाढ करण्याच्या विचारात आहे. प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांवर अधिक भार पडणार आहे. या प्रस्तावावर जनतेच्या सुचना हरकती मागवल्यानंतर विज नियामक आयोग यावर निर्णय घोणार आहे. गतवर्षी महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दरवाढीसंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानुसार आयोगाने ही याचिका मंजूर करून दिलेल्या आदेशानुसार ही दरवाढ करण्यात येणार आहे.