Eknath Shinde, Sada Saravankar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर शिवसेना दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava 2022) घेण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गटाच्या वतीने शिवसेना आमदार म्हणून सदा सरवणकर यांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. शिवाजी पार्क येथे मेळावा घेण्यासाठी आपणही अर्ज केला आहे. त्यामुळे आपल्यालाच या ठिकाणी परवनगी मिळवी अशी याचिका सदा सरवणकर यांनी दाखल केली होती. जी न्यायालयाने फेटाळून लावली.

सदा सरवणकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जो युक्तीवाद करण्यात आला. त्या युक्तिवादाशी आपण सहमत असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. सदा सरवणकर यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, आजच्या याचिकेचा विषय केवळ शिवाजी पार्क मैदानावरील परवानगी इतकाच मर्यादीत आहे. शिवसेना नेमकी कोणाची हा आजच्यायाचिकेचा विषय नाही. त्यामुळे आपण युक्तीवाद फार लांबवू नका. त्यामुळे आपण केवळ शिवाजी पार्क या विषयावरच बोला, आम्हाला पुढे आदेशही द्यायचे आहेत, अशा शब्दात कोर्टाने सुनावणी वेळी सरवणकर यांच्या पक्षाला काहीसे झापले. (हेही वाचा, Shivsena Dasara Melava 2022: शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा? शिवसेनेच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी)

सदा सरवणकर यांच्या याचिकेवर बाजू मांडताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने याआधीच्या सर्व बाबींचा दाखला देण्यात आला. पाठिमागील अनेक वर्षे शिवसेना शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेत आली आहे. या मैदानासाठी शिवसेनेचे अनिल देसाई हेच अर्ज करत आले आहेत. सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या वतीने काहीच वेळा अर्ज केला आहे. त्यामुळे शिवसेनेना परंपरेने या ठिकाणी अर्ज करत आली आहे, असेही शिवसेनेने ठासून सांगितले.

दरम्यान, शिवाजी पार्क येथे आपण मेळावा घेता. परंतू, तो आपला अधिकार नाही, असे न्यायालयाने शिवसेनेला सांगितले. शिवाजी पार्क मैदानावर आपण पाठिमागील अनेक वर्षे मेळावा घेत आलो आहोत. हा त्यामुळे यंदाही या ठिकाणी मेळावा घेण्याचा आमचा हक्क आहे, असा युक्तीवाद शिवसेनेने केला होता. या युक्तिवादावर न्यायालयाने ही भूमिका मांडली.