Eknath Khadse on Devendra Fadnavis: राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल
Eknath Khadse, Devendra Fadnavis | (Photo credit: Archived, Edited, Symbolic Images)

Eknath Khadse on Devendra Fadnavis:  भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी पक्षांनी सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली असल्याचे दिसून आले आहे. पक्षात असताना ज्या पद्धतीने फडणवीस यांनी छळ केला त्याची व्यथा सुद्धा एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर समोर आणले. त्यानंतर आता पुन्हा खडसे यांनी फडणवीस यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.(Eknath Khadse: मोठी बातमी! अमळनेरहून जळगावकडे जाताना जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वाहनाला अपघात)

एकनाथ खडसे यांच्या अनेक समर्थकांनी आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी खडसे यांनी म्हटले की, ज्या पक्षाला मी लहानाचे मोठे केले तो सोडवासा वाटत नव्हता. परंतु माझ्यावर ज्या पद्धतीने आरोप लावले गेले. छळ केला गेला आणि ऐवढेच नाही तर एका महिलेच्या विनयभंगाचा सुद्धा गुन्हा माझ्या विरोधात दाखल केला गेला होता. मात्र तो नंतर मागे घेण्यात आला. पुढे खडसे यांनी म्हटले की, आपलेच गद्दार निघाले त्यामुळे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू तरी बराच. याच कारणास्तव पक्षाला रामराम ठोकला. तसेच आयुष्याची चाळीस वर्ष पक्षाच्या कार्यासाठी दिली. तरी सुद्धा माझा छळच झाला.(Eknath Khadse On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच एकनाथ खडसे यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया)

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी 23 ऑक्टोंबरला राष्ट्रवादी पक्षात शरद पवार यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला. त्यावेळी खडसे यांनी भाजपवर टीकास्र सोडल्याचे दिसून आले होते. तर भाजप पक्षात राहून जे काही घडले आणि अनुभवले त्याची खंत मात्र त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर बोलून दाखवली. तसेच कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. जेष्ठ म्हणायचे आणि मागून खंजीर खुपसायचा, अशा शब्दात त्यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता.