Eknath Khadse AND Devendra Fandnavis (Photo Credit: PTI)

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. त्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. "मी टीव्हीवर फडणवीसांना कोरोना झाल्याचे पाहिले. त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा, असे नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले आहेत. फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दौरा करत होते. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही भाजपने त्यांच्यावर सोपवलेली असल्याने बिहारमध्येही ते सातत्याने फिरतीवर होते.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी! अशा आशयाचे ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. हे देखील वाचा-Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांना यापुढे अंमलदार म्हणून संबोधले जाणार; कारण घ्या जाणून

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट-

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, सर्वसामन्यांसह अनेक राजकीय नेते, कलाकार आणि खेळाडू कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना कोरोनावर मात केली आहे.