Eknath Khadse: मोठी बातमी! अमळनेरहून जळगावकडे जाताना जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या वाहनाला अपघात
Eknath Khadse | (File Photo)

जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या वाहनाला अपघात (Car Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. अमळनेर हून जळगावकडे जाताना धरणगाव नजिक हा अपघात घडला आहे. या अपघात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजत आहे. या अपघाताची माहिती होताच एकनाथ खडसे यांच्या समर्थकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी आपण सुखरूप असल्याचे ट्वीट केले आहे. तसेच वाहन चालकाच्या प्रसंगावधाने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने आणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप आहोत. कोणालाही इजा झालेली नाही, अशा आशयाचे ट्विट एकनाथ खडसे यांनी केले आहे. हे देखील वाचा-Raj Thackeray On Sean Connery: जेष्ठ अभिनेते शॉन कॉनरी यांच्या निधनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे झाले भावूक; ट्विटरवर केली 'अशी' पोस्ट

एकनाथ खडसे यांचे ट्वीट- 

भाजपमध्ये गेल्या 40 वर्षापासून कार्यरत असलेले एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात बळ मिळाले आहे. त्याचबरोबर त्यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चाही सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.