भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस बजावल्याची प्रसार माध्यमांत झळकत आहे. येत्या 30 डिसेंबरला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, ईडीला नक्की कोणत्या प्रकरणात एकनाथ खडसे यांची चौकशी करायची आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीला कोणते पुरावे मिळाले आहेत? यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ खडसे यांच्यासोबत पुण्यातील काही लोकांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. एकनाथ खडसे यांनी ईडीच्या नोटीशीवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अद्याप मला ईडीची नोटीस मिळालेली नाही. ज्यादिवशी एकनाथ खडसे यांनी पक्षप्रवेश केला त्याचदिवशी त्यांनी हे ईडीची नोटीस देतील, असे सांगितले होते. पण ते ईडी लावतील तर मी सीडी लावेल, असे विधान एकानाथ खडसे यांनी केले होते.  हे देखील वाचा- Sanjay Raut On Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडीवरून मोर्चा काढल्यानंतर संजय राऊत यांनी दिली 'अशी' प्रतिक्रिया

एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, "आता महाराष्ट्राच्या जनतेलादेखील माहिती पडले आहे, कशाप्रकारे यंत्रणांचा चुकीचा फायदा घेऊन भाजपचे लोक धिंगाणा घालत आहेत. लोकांना हे जवळपास लक्षात आले आहे”, असेही अमोल मिटकरी म्हणाले आहेत. यासंदर्भात टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.