ईडी लागली मागे, आता सीडी लावण्याचं काम बाकी- एकनाथ खडसे
Eknath Khadse | (File Photo)

राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी "तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर मी तुमची सीडी लावेन" असे गंमतीने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात गंमतीने सांगितले होते. मात्र अलीकडेच त्यांच्यामागे ईडी लागली. त्यामुळे "आता माझ्यामागे ईडी लागली त्यामुळे आता सीडी दाखवणे बाकी आहे" असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी कुणाचही नाव न घेता गौप्यस्फोट केला आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात रात्री संवाद यात्रेदरम्यान बोलताना एकनाथ खडसेंनी हे वक्तव्य केलं.

"मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा जयंत पाटील यांनी एक विधान केले होते. तुमच्यामागे आता ईडी लागू शकते अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी ईडी लावली तर मी त्यांची सीडी लावेन असे म्हणालो होते. आता प्रत्यक्षात माझी ईडी चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचे काम करणार आहे." असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपला इशारा दिला आहे.हेदेखील वाचा- Ashish Shelar on Maharashtra Government: 'ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे'; शिवजयंतीच्या नियमावलीवरुन आशिष शेलार यांची टीका

भाजप सोडून राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, "दिल्लीतील वरीष्ठांनी राष्ट्रवादीत जाण्याचा सल्ला दिला. माझ्यावर विनयभंगाचा खटला टाकला, आयुष्याची चार वर्षे वाया घालवली. भूखंडाच्या चौकश्या लावल्या, जयंतराव कोणी किती भूखंड घेतले आता सांगतो. मी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही, पक्षाचे काम करत राहणार. भाजप जशी वाढवली त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी वाढवून दाखवणार. जयंतराव मला बोलले तुम्ही राष्ट्रवादीत आले, तर ईडी बिडी लावतील तर मी बोललो मी सीडी लावीन. समोरासमोर संघर्ष केला, पाठीत खंजीर खुपसला नाही. आयुष्यातील चाळीस वर्षे भाजपमध्ये काम केलं. स्वाभाविक आहे जिथे 40 वर्ष राहिलो एकाएकी पक्ष कसा सोडायचं असं वाटत होतं. माझी किती मानहानी झाली, छळवणूक झाली हे सांगितलं."

त्यामुळे आता एकनाथ खडसे कोणाचा नवा व्हिडिओ दाखवणार, ती सीडी कुणाची असणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.