महाराष्ट्रात 53 टक्के पुरुष तर 42 टक्के महिला अविवाहित, रोजगार-शिक्षणातून बदलतेय मानसिकता: सर्वेक्षणातून माहिती उघड
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रात (Maharashtra) आर्थिक सर्वेक्षणातून 2018 मध्ये काही सामाजिक गोष्टींमुळे नागरिकांच्या वागण्याबोलण्यात बदल झाल्याचे दिसून आले आहे. त्याचसोबत लोकांची मानसिकता काळानुसार बदलत आहे. त्यामुळे राज्यात 53.5 टक्के पुरुष आणि 42.5 टक्के महिला अविवाहित असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.याचे मुख्यत्वे कारण रोजगार आणि शिक्षणातून लोकांची मानसिकता बदलत आहे असे दिसून आले आहे.

राष्ट्रीय स्तरावर अविवाहित पुरुषांची संख्या 54.5 टक्के आणि महिलांची संख्या 44.8 टक्के आहे. समाजशास्त्रज्ञ आणि जनसंख्या वैज्ञानिकांनी अविवाहित पुरुष-महिला या शिक्षण आणि कामासाठी पलायन करत असल्याचे स्पष्ट केले आहे. मिरर नाऊ यांच्या मतानुसार, राज्यातील सामाजिक आर्थिक स्थितीसुद्धा याचे कारण ठरु शकते असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील जनसंख्येत विधवा, घटस्फोट यांसारख्या घटनांमधील पुरुषांची संख्या 1.5 टक्के आणि महिला 6.4 टक्के असल्याचे सांगितले आहे.

(2021 जनगणना होणार ऑनलाईन, पहिल्यांदाच मोबाईल ऍपचा वापर)

तर सर्वेक्षणातून उघड झालेले हे आकडे सॅंम्पल रजिस्ट्रेशन सिस्टम 2016 मधून घेण्यात आले आहेत. त्याचसोबत गोखले इंन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँन्ड इकोनॉमिक्स प्रोफेसर संजीवनी मुळे यांनी असे म्हटले आहे की, सामान्य स्तरावर महाराष्ट्रात लग्न करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे.