Earthquake in Sangli: चांदोली धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असताना धरणीकंप
सांगलीत भूकंपाचे धक्के जाणवले. चांदोली धरणाचा परिसर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये काही काळ भितीचे वातावरण होते.
Earthquake in Sangli: राज्यात सर्वदूर कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. सांगलीत गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरु (Heavy Rain in Sangli)आहे. चांदोली धरण(Chandoli Dam)परिसरात अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. अशातच बुधवारी पहाटे चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 4 वाजून 47 मिनिटांनी चांदोली धरण परिसरात भूकंपाचे (Earthquake in Sangli) सौम्य धक्के जाणवले. 3 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली. शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे आठ किलोमीटर परिसर भूकंपाने हादरला. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. (हेही वाचा:Earthquake in Marathwada: परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के; 4.2 रिश्टर स्केलची तीव्रता )
विशेष म्हणजे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सांगलीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली आहे. सुदैवाने भूकंपाचे सौम्य होते. त्यामुळे धरण परिसरात कोणताही धोका नाही. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. गेल्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. हे धरण 82 टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मात्र, त्याचवेळी भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मराठवाड्यात भूकंप
काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, जालना अशा एकूण चार जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. तेथे 4.5 रिश्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता नोंदवली गेली. विदर्भातील वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यातील काही भाग भूकंपाच्या धक्क्याने हादरला होता.
भूकंप पावसासाठी चांगला?
मराठवाड्यातील भूकंपाचे धक्के हे भविष्यातील चांगल्या पावसाचे चिन्ह असू शकते, असा अंदाज डख यांनी व्यक्त केला आहे. भूकंप हा चांगल्या पावसाचे लक्षण आहे. जेव्हा-जेव्हा भूकंपाचे धक्के बसतात, तेव्हा-तेव्हा खूप पाऊस पडतो लातूर जिल्ह्यातील किल्लारीला जेव्हा भूकंप झाला होता, त्या वर्षी खूप पाऊस झाला होता. तशीच परिस्थिती यावेळी होणार आहे," असे पंजाबराव डख यांनी सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2024 08:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

