Earthquake in Marathwada: मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात सकाळी भूकंपाचे(Earthquake)धक्के जाणवले आहेत. आज 10 जुलै रोजी पहाटे झालेल्या या भुकंपामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 7 वाजून 15 मिनिटांनी हे धक्के जाणवले. जवळपास 15 मिनिटे हा भूकंप जाणवला. भूकंपाचे धक्के जाणवलेल्या भागात मराठवाड्यातील(Earthquake in Marathwada) 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. ते म्हणजे परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील (Earthquake in Vidarbha) वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सुदैवाने भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कुठे पडझडीच्या घटना घडल्या नाहीत. (हेही वाचा:Earthquake In Khandwa: मध्य प्रदेशातील खंडवा येथे भूकंपाचे धक्के; 3.6 तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण )
हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपामुळे तेथील लोक घाबरले आहेत. 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भुकंपाचे धक्के तेथे नोंदवले गेले. परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भुकंपाचा धक्का जाणवला आहे. अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक भयभीत होऊन घराबाहेर आले. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा हा धक्का 4.2 रिश्टर स्केल एवढ्या तीवृतेचा होता.
वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये सकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी आणि 7 वाजून 14 मिनिटांनी दोन भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. त्यामुळे नागरिकांसह जनावरे भयभीत होऊन घरे, गोठ्यातून बाहेर पडली.