Earthquake

Earthquake In Khandwa: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा (Khandwa) येथे आज सकाळी भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले. रात्री 9.04 वाजता शहरात भूकंपाचे सौम्य धक्के लोकांना जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 इतकी मोजण्यात आली आहे. सुदैवाने या भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

काही ठिकाणी लोकांनी स्फोटासारखे आवाज ऐकले तर काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भूकंपाचा केंद्रबिंदू खंडव्यापासून 10 किलोमीटर अंतरावर होता. शहरातील आनंद नगर, हाऊसिंग बोर्ड कॉलनी, माता चौक, एलआयजी, सिंघड तलाई, कीर्ती नगर, गुलमोहर कॉलनी, नवकार नगर आणि इतर वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांनी भूकंपाची पुष्टी केली आहे. (हेही वाचा - Rajasthan Earthquake: राजस्थान मधील सीकर भागात मध्यरात्री भूकंपाचे धक्के; 3.9 रिश्टर स्केलची तीव्रता)

प्राप्त माहितीनुसार, भूकंपाचे धक्के संपूर्ण जिल्ह्यात जाणवले आहेत. मात्र, लोकांना फक्त कंपन जाणवले, कोणतेही नुकसान झाले नाही. स्थानिक हवामान खात्याने भूकंपाची तीव्रता 3.6 एवढा वर्तवली आहे.

बैतूलमध्ये भूकंप -

यापूर्वी 11 जून रोजी राज्यातील बैतूल जिल्ह्यातही भूकंप झाला होता. तापी नदीच्या काठावर भूकंपाचे धक्के जाणवले. काही घरांच्या भिंतींनाही तडे गेले होते. खांडवा जिल्ह्याचा समावेश भूकंप संवेदनशील क्षेत्रात आहे. 20 वर्षांपूर्वी पूर्व पांधणा तहसीलच्या टाकळी संहिता बागमार परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते.