E-Bike Catches Fire: कराड येथे बॅटरीच्या स्फोटामुळे ई- बाईकला आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video)
E Bike Explosion pc TWITTER

E-Bike Catches Fire: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात रविवारी ई बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला आहे. घरी चार्जिंग लावल्यानंतर काही वेळाने ई बाईक चालू केल्यानंतर अचानक स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत गाडीचे नुकसान झाले आहे. वाहनातून धुराचे लोट पसरत होते आणि बाईकची बॅटरी आणि सीट कव्हराला आग लागली. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी ई बाईकच्या बॅटरीचा घरात स्फोट झाल्याची बातमी आहे. (हेही वाचा- बिहारमधील खगरिया येथे कार-ट्रॅक्टरचा भीषण अपघातात; 7 जणांचा मृत्यू,

मिळालेल्या माहितीनुसार, बाईकचे मालक गणेश चव्हाण यांनी मे २०२२ मध्ये  बेनलिंग ऑरा ही ई-बाईक खरेदी केली होती. त्यांच्या राहत्या घरी इलेक्ट्रिक टू-व्हीलर चार्ज केल्यानंतर चव्हाण यांनी ती बाहेर नेली, तेथे दुचाकीच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला. जवळपासच्या लोकांमध्ये स्फोटामुळे घबराट निर्माण झाली असूनही, उपस्थितांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली.

सुदैवाने घटनेत कोणतेही जीवित हानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास सुरु आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, स्फोटामुळे ई बाईकचे भरपूर नुकसान झाले आहे. आता पर्यंत ई- बाईकच्या स्फोटाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.