Bihar Road Accident Video: बिहारच्या खगरियामध्ये एक मोठी दुर्घटना (Bihar Accident) घडली आहे. लग्न सोहळ्यातून परतताना कार आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक (car and tractor collide)झाली. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. ज्यात 3 मुलांचाही समावेश आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींसह मृतदेह रुग्णालयात नेले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतरचा व्हिडिओ समोर आला आहे. ही टक्कर किती जोरदार होती हे व्हिडिओमधून दिसत आहे. कारण कारचा पुढचा भाग उडून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. (हेही वाचा:Rajasthan Rail Accident: Sabarmati-Agra Cantt ट्रेनचे चार डब्बे इंजिन सह रेल्वे रूळावरून घसरले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)