Dr Rahul Ghule यांचा राजकीय दबावातून आत्महत्येचा प्रयत्न; हॉस्पिटल मध्ये दाखल
Dr. Rahul Ghule | Photo Credits: Twitter

वन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले ( Dr Rahul Ghule) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान राजकीय दबावाखाली हा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं ट्वीट राहुल घुले यांनी केले आहे. सध्या राहुल घुले यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांनी प्रकृतीचे अपडेट्स देण्यासाठी काही ट्वीट देखील केले आहेत. मागील काही दिवसांपासून राहुल घुलेंनी ट्वीट करत राजकीय एजंट्सपासून आपल्या जिवाला धोका असल्याचं म्हटलं होते. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील मदत मागितली होती.

कोरोना संकट काळामध्ये वन रूपी क्लिनिकनेही मोठे सहकार्य केले होते. नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर उभं करून त्यांचे कोविड 19 चे उपचार तेथे सुरू होते. राहुल घुले हे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक आहेत. अवघ्या एक रूपयाच्या फी मध्ये ते रूग्णांवर उपचार करत असल्याने त्यांच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक झाले होते. मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशन पासून त्यांनी या क्लिनिकची सुरूवात केली होती बघता बघता ही क्लिनिक आता अनेक स्टेशन नजिक उपलब्ध आहेत. वन रुपी क्लिनीकच्या मदतीने महिलेची पनवेल रेल्वे स्थानकावर सुखरुप प्रस्तुती.

राहुल घुले ट्वीट

दरम्यान काही दिवसांपूर्वी ट्वीटर वरून दूर जाण्याची वेळ आली आहे असे सूचक ट्वीट त्यांनी केले होते. पण आता काल रात्री त्यांनी राजकीय दबावाचा दाखला देत आणि पैशांच्या व्यवहारात सामान्य व्यक्तीला होत असलेल्या त्रासातून आत्महत्येसारखी वेळ आली आहे असे सांगत त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.