वन रुपी क्लिनीकच्या मदतीने महिलेची पनवेल रेल्वे स्थानकावर सुखरुप प्रस्तुती
(Photo Credit : ANI)

मुंबईमध्ये (Mumbai) नेरुळ (Nerul) ते पनवेलकडे (Panvel) जाणाऱ्या एका प्रवाशी महिलेची वन रुपी क्लिनिकच्या (One Rupee Clinic) मदतीने सुखरुप प्रसुती करण्यात आली आहे. त्यानंतर संबधित महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळ आणि आई दोघेही स्वस्थ आहेत. या महिलेला योग्य वेळी मदत केल्याने वन रुपी क्लिनिकचे डॉक्टर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे. तसेच वन रुपी क्लिनिक अधिक फायदेशीर ठरत असल्याचे समजत आहे.

याआधी मुंबई येथील ठाणे रेल्वे स्थानकावर वन रुपी क्लिनिकच्या मदतीने एका महिलेनी बाळाला जन्म दिला होता. गर्भवती महिला इशरत शेख तिच्या नातेवाईकांसह तिच्या प्रसुतीसाठी अंबिवली स्थानकावरुन कुर्ला येथील रुग्णालयात जात होती. दरम्यान, इशरत हिला प्रसुती वेदना जाणवू लागल्यानंतर रेल्वे पोलिसांना यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. हे देखील वाचा- नालासोपारा: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्या कारणाने 14 वर्षीय मुलीला आरोपीने केली बेदम मारहाण; पीडित मुलगी गंभीर जखमी

एएनआयचे ट्वीट-

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांयकाळी ६ वाजताच्या सुमारास इशरत हिला प्रसुती वेदना सुरु झाल्याची माहिती रल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी वेळ न घालवता या महिलेची मदत केली होती. दरम्यान, या इशरतला वन रुपी क्लिनिक कक्षात घेऊन जाण्यात आले. सर्व आवश्यक गोष्टींचा साठा घेऊन मेडिकल स्टाफ, आणि रेल्वे पोलिसांनी ठाणे येथील प्लॅटफॉर्म येथे धाव घेतली. त्यावेळी इशरतला प्लॅटफॉर्म २ वरील वन रुपी क्लिनिकच्या येथे घेऊन जाण्यात आले. त्यानंतर काही क्षणातच इशरत हिने तिच्या बाळाला जन्म दिला होता.