पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी व्हायरल ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी करा, देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना पत्र
Pooja Chavan And Devendra Fadnavis (Photo Credits: PTI)

बीड जिल्ह्यातील परळी बैजनाथ येथील सोशल मिडिया स्टार 22 वर्षीय तरुणी पूजा चव्हाण (Pooja Chavan) हिच्या आत्महत्येमागे काही राजकीय नेत्यांचा संबंध असल्याची चर्चा होऊ लागल्यानंतर आता हे प्रकरण अधिकच चिघळू लागले आहे. या आत्महत्येसंबंधी एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पोलीस महासंचालकांना लिहिले आहे. हे पत्रक देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे की, "पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्याप्रकरणातील काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत. अशा एकूण 12 ऑडिओ क्लिप्स माझ्या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. आपल्या अवलोकनार्थ त्या ऑडिओ क्लिप्सची प्रत या पत्रासोबत जोडत आहे. या ऑडिओ क्लिप्समध्ये बोलणारे कोण आहेत? त्यांच्या संवादाचा नेमका अर्थ काय? त्यातून पूजा चव्हाणची खरोखर आत्महत्या आहे की तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. एकूणच तिच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण यामुळे निर्माण होत आहे."हेदेखील वाचा- Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण; 'त्या' ऑडिओ क्लिपनंतर भाजप आक्रमक

त्याचबरोबर "सध्याचा तपास हा वरकरणी होत असल्याचे खेदाने नमूद करावेसे वाटते. ही आत्महत्या किंवा आत्महत्येमागील घटनाक्रम संशयास्पद असल्याचा आरोप त्यामुळे बंजारा समाजातून मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे या सर्व ऑडिओ क्लिप्सची सखोल आणि सर्वंकष चौकशी होणे नितांत गरजेचे आहे. ही चौकशी तात्काळ करून बंजारा समाजात अतिशय लोकप्रिय असलेल्या या तरुणीला तत्काळ न्याय द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी" अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली आहे.

मूळची बीड जिल्ह्यातील असलेली पूजा तिच्या मित्रासोबत वानवडी भागात फ्लॅटमध्ये राहत होती. पूजाचे भाजपच्या नेत्यांसोबत देखील फोटो असल्याचे दिसून येत आहे