Devendra Fadnavis,Sharad Pawar, Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Devendra Fadnavis On ddhav Thackeray and Sharad Pawar: मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यामुळेच लांबल्या आहेत. त्यांनीच वेगवेगळ्या याचिका कोर्टात दाखल केल्या आहेत. या याचिकांवर कोर्टात सुनावणी होऊन लवकरच निकाल लागेल. त्यानंतर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये बीएमसी निवडणुका (Devendra Fadnavis On BMC Election) होतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या पॉडकॉस्टमध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी 29 रोजी ही मुलाखत एएनआयला (ANI) दिली आहे. या वेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही 'डबल गेम' केल्याचा आरोप केला.

आरक्षण आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने दाखल केलेल्या याचिका अशा सर्व याचिका कोर्टाने एकत्र करुन एक स्टेटेस्को दिला आहे. लवकरच त्याचा निकाल लागेल. या याचिकांचा निकाल लागत नाही तोवर निवडणुका होणार नाहीत. मात्र, अशी स्थिती असताना उद्धव ठाकरे जेव्हा बोलतात निवडणुका घ्या. तेव्हा ते दुटप्पी वागतात. एका बाजूला याचिका करायची. निवडणुकांना स्थगिती आणायची आणि दुसऱ्या बाजूला निवडणूका घ्या असे म्हणायचे. ते असे बोलता तेव्हा मला आश्चर्य वाटतं, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आगामी बीएमसी निवडणुका शिवसेना पक्षासोबतच लढणार. तसेच, बीएमसीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिलेला 150 चा नारा कायम असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. (हेही वाचा, Thackeray Group Meeting: महाराष्ट्रात आज बैठकांचा सिलसिला; ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठका)

व्हिडिओ

विधानसभआ निवणूक 2019 पूर्वीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात समझोता झाला होता. त्यामुळे दोघांनी भाजपविरोधात एकमेकांना मदत केली. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर आमच्या जागा आणि बहुमत यांच्यात काही अंतर पडले. त्यामुळे आकडे फसतात हे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांची भाषा बदलली. आम्ही एकत्र निवडणुका लढलो होतो. मात्र, त्यांना महाविकासाघाडीसोबत जायचे होते तर त्यांनी युती तुटल्याचे आम्हाला सांगितले देखील नाही. आमचा फोनही घेतला नाही. केवळ स्वार्थासाठी त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आम्हाला धोका दिला. तर शरद पवार यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या नव्हत्या. ते आमचे विरोधकच होते. मात्र, त्यांनीआमच्यासोबत 'डबल गेम' केला, असे फडणवीस म्हणाले.