राज्याला कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचा धोका? पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार
Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

राज्यात कोविड-19 तिसरी लाट (Covid-19 Third Wave) येऊ नये यासाठी काळजी घेऊया. मात्र तरी देखील तिसरी लाट आल्यास तर लहान मुलांसाठी स्वतंत्र सेंटर निर्मिती करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज सांगितले. विशेष म्हणजे पुण्यातील येरवडा येथे लहान मुलांसाठी 100 बेड्सचं कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. मात्र सध्या या सेंटरमध्ये सर्वच रुग्णांवर उपचार केले जात आहेत, असंही पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे (Pune) जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

पुण्यातील पॉझिटीव्ह रुग्णसंख्या कमी होत असून ही अत्यंत समाधानाची बाब आहे. परंतु, ग्रामीण पुण्यामध्ये अपेक्षेप्रमाणे कोरोना रुग्णसंख्या घटलेली नाही. मात्र आता पुण्यात रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा नाही, असेही ते म्हणाले.त्याचबरोबर लसीच्या प्राधान्यक्रमाबद्दल भाष्य करताना पवार म्हणाले की, 45 वर्षीय व्यक्तींना दुसरा डोस देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करणे अधिक महत्त्वाचे आहे. तसंच लसींच्या मागणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं काम सुरु आहे. पुणे, मुंबई महानगरपालिकांनी लसींसाठी ग्लोबल टेंडर देखील काढलं आहे. (Coronavirus 3rd Wave: कोरोना विषाणूची संभाव्य तिसरी लाट गृहित धरून काटेकोर नियोजन करण्याचे उप मुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश)

ANI Tweet:

पुढे ते म्हणाले की, राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी इन्जेक्शन्सचा तुटवटा जाणवत आहे. पुण्यामध्ये म्युकरमायकोसिसचे सध्या 300 रुग्ण आहेत. यात इतर जिल्ह्यांमधील नागरिकांचाही समावेश आहे. म्युकरमायकोसिससाठी सुमारे 1800 इंजेक्शन्स पुण्याला लागत आहेत. मात्र ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे या इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.