Dipali Sayyad on Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घरात दावणीला बांधलेली म्हैस शिवसेनेच्या वाटेवर सोडू नये. अन्यथा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हे स्वप्नचं राहील, असा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या दीपाली सय्यद (Dipali Sayyed) यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकातून न्यू कामगार संघटनेच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे उद्घाटन दीपाली सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकांरांनी दिपाली सय्यद यांना अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी भोंग्याच्या वादावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्यानंतर आपली प्रतिक्रिया काय असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर दीपाली सय्यद यांनी अमृता फडणवीस यांना थेट म्हशीची उपमा दिली. (हेही वाचा - CM Uddhav Thackeray on Raj Thackeray: भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका)
यावेळी बोलतना दिपाली सय्यद म्हणाल्या की, राज्यात सरकार स्थापन करू न शकल्याने भाजपकडून राष्ट्रपती राजवटीसाठी अत्यंत खालच्या थराचे राजकारण केलं जात आहे. त्यामध्ये जातपात, हिंदू मुस्लिम दंगली, असे प्रकार भाजपकडून करण्यात येत आहेत. यातून त्यांचा उद्देश राज्यात भाजप सरकार स्थापन करणे हा आहे. परंतु, हे राज्य सर्वधर्माच्या लोकांचे आहे. त्यामुळे दंगली झाल्यातर त्यामध्ये सर्वाधिक सामान्य नागरिक भरडल्या जातो. त्यामुळे सर्वांनी शांतात पाळावी, असे आव्हान दिपाली सय्यद यांनी केले.
दरम्यान, यावेळी दिपाली सय्यद यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. यासंदर्भात बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या, आज होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेला माझ्या शुभेच्छा आहेत. राज ठाकरेंनी भोग्यांवरून राजकारण सुरु केलं. यापूर्वी त्यांना कधीचं विजय मिळवता आला नाही. किमान आता तरी त्यांना विजय मिळो, अशी खोचक टीकाही दिपाली सय्यद यांनी केली.
राज ठाकरे यांच्या आजच्या सभेमुळे हिंदू आणि मुस्लीम समाज विभागला जाईल. काही हिंदू राज ठाकरे यांच्या पाठी जातील. तर काही मुस्लीम असदुद्दीन ओवेसी यांच्या मागे जातील. परंतु, या सर्वात गरीब माणूस भरडला जाईल, असं मत दीपाली सय्यद यांनी यावेळी व्यक्त केलं.