| (Photo Credits: PTI)

Dahisar Toll Naka: गेल्या काही दिवसांपासून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे येथे काशीमीरा ते दहिसर टोल नाक्याच्या पुढे सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. याच कारणास्तव मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी 15 डिसेंबरला या संदर्भात एक महत्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार चालकांची वाहतूक कोंडी पासून लवकरच सुटका होईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.(Maharashtra Cabinet Decision: राज्यात यावर्षी 10 हजार किमी लांबीचे रस्ते बांधले जाणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतले महत्वाचे निर्णय)

दहिसर टोल नाक्यासंदर्भाचा मुद्दा हा काही काळापासून रखडला गेला आहे. दररोज येथे प्रवास करणाऱ्यांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. अशातच मेट्रोचे सुद्धा काम सुरु असण्यासह रस्त्यांची झालेली चाळण, वाहनांवरील फास्टॅगची मॅन्युअल स्क्रिनिंग या सर्व गोष्टींमुळे परिणामी वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे या टोल प्लाझाचा नियमितपणे वापर करणाऱ्यांना वेळेपेक्षा अधिक इंधनासाठी खर्च करावा लागत आहे.

प्रवाशांनी बहुतांश वेळा सोशल मीडियात सुद्धा या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. परंतु तरीही तेथील स्थिती जशीच्या तशीच आहे. परंतु ट्विटरवर आदित्य ठाकरे यांनी असे म्हटले की, एमएमआरडीए आणि वाहतूक पोलीस यांच्यासोबतीने दहिसर टोल नाक्यावर योग्य व्यवस्था योजना केली जाईल. तर मेट्रोच्या कामासारख्या काही मुद्द्यांमुळे जवळजवळ 15 दिवस लागतील. त्यानंतरच वाहतूक कोंडी पासून सुटका मिळेल.(Mumbai Airport वर Rapid RT-PCR Test च्या दरात कपात; नवे दर 4500 वरून 1975 रूपये)

दहिसर टोल प्लाझा हा मुंबईतील पाच प्रवेश बिंदुंमधील सर्वाधिक वाहतूक असलेला मार्ग आहे. दहिसर टोल गुजरात आणि अन्य राज्यांच्या राष्ट्रीय महामार्गांना जोडला जातो. त्यामुळे व्यावसायिक कंटेनर मोठ्या संख्येने या मार्गावरुन जातात. तर दहिसर टोल प्लाझा येथे दररोज जवळजवळ 4 लाख वाहने ही दोन्ही दिशांनी धावत असतात.