Cyclone Tauktae Impact: मुंबईसह उपनगरात मध्मम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्याता व्यक्त करण्यात आली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे ही स्थिती निर्माण होणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. पावसासह 80-90 प्रति तास वेगाने वारे ही वाहणार असल्याचे महापालिकेच्या आयएमडी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(Tauktae Cyclone: मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा; प्रशासनाला परिस्थिती मूळ पदावर आणण्याबाबत सूचना)
अधिकाऱ्यांच्या मते, पालघर मधील दोन जणांचा मृत्यू तर ठाणे येथे एकाचा तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे मृत्यू झाला आहे. तर सकाळी 8.30 ते संध्याकाळी 5.30 दरम्यान चक्रीवादळ मुंबईहून गुजरातच्या दिशेने सरकणार आहे. मुंबईतील कुलाबा येथे 189 मिलीमीटर आणि सांताक्रुझ मध्ये 194 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
याआधी महापालिकेने म्हटले होते की, मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात 114 प्रति तास वेगाने वारे वाहणार आहेत. पालघर मधील 51 वर्षीय रिक्षाचालकाच्या रिक्षावर झाड पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना वाळीव परिसरात घडल्याचे पोलिसांनी सोमवारी म्हटले आहे.
तसेच वेगाने वाहाणाऱ्या वाऱ्यामुळे एक 40 वर्षीय व्यक्तीवर इमारतीच्या सिमेंटचा ब्लॉग पडल्याने मृत्यू झाला आहे. ठाणे येथे ही मुसळधार पावसाने घर कोसळून एका 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत लोकपुरम येथे ही 50 फूट हाउसिंग सोसायटीचा स्लॅब कोसळण्यासह एक स्ट्रिट लॅम्प पडून 4 वाहनांचे नुकसान झाले आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.(Cyclone Tauktae: महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळामुळे 6 जणांचा मृत्यू, 9 जखमी)
नौपाडा येथे सुद्धा झाडे आणि इलेक्ट्रिक पोल पडून 6 वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच सोमवारी एक डॉक्टर आपल्या रुग्णलयाच्या दिशेने जात असताना एक मोठे झाड त्याच्या गाडीवर पडले. या घटनेची माहिती मिळताच आरडीएमसी आणि स्थानिक अग्नीशमन दलाकडून घटनास्थळी धाव घेत त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.