Cyclone Nisarga Ratnagiri | (Photo Credits- ANI)

अवघा महाराष्ट्र कोरोना व्हायरस संकटाविरुद्ध लढत असतानाच आता निसर्ग चक्रिवादळ संकटही महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. निसर्ग चक्रीवादळ अवघ्या काही तासात महाराष्ट्रात दाखल होऊ शकते. चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका हा महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीला आहे. यात कोकण, मुंबई आणि रायगड जिल्ह्याला अधिक धोका अधिक संभवतो. प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करताना म्हटले आहे की, आज सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत हे वादळ मुंबई किनारपट्टीवर धडकू शकते. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका हा अलिबाग किनारपट्टी आणि परिसराला संभवतो. या सर्व घटना घडामोडी पाहता संभाव्य परिस्थिती विचारात घेऊन महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि रेल्वे यंत्रणा सज्ज झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाचे संकट निपटण्यासाठी सरकारच्या वतीने काय तयारी केले आहे याचा अल्पसा अढावा.

हवामान विभागाची माहिती

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर काही तासांमध्ये दाखल होईल. पाठिमागील 6 तासांपासून प्रतितास 13 किलोमीटर वेगाने वादळ वाहात आहे. हे वादळ रायगड जिल्ह्यातील अलिबाग किनारपट्टीच्या दक्षिणेस 155 आणि मुंबई दक्षिण-पश्चिम किनापट्टीच्या 200 किमी दूर आहे.

ट्विट

ट्विट

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या पावसाला सुरुवात झाली आहे.

एनडीआरएफची माहिती

एनडीआरएफ महासंचालक एनएस प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळ संकटाचा संभाव्य धोका विचारात घेऊन एनडीआरएफ सज्ज झाले आहे. मुंबई दक्षिण-पश्चिम, रायगड, पालघर, डहाणू किनारपट्टी परिसरात एनडीआरएफ जवानांच्या तुकड्या आवश्यक ती सर्व यंत्रणा सुसज्ज करुन तैनात आहेत. (हेही वाचा, Cyclone Nisarga Update: निसर्ग चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात दरम्यान हरिहरेश्वर, दमन येथून 3 जूनला दुपारनंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे धडकण्याची शक्यता- आयएमडी)

ट्विट

रेल्वे सेवा

निसर्ग चक्रीवादळाचा धोका विचारात घेऊन मुंबईतून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईहून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार, मुंबई टर्निललहून 5 गाड्या सुटणार आहेत. तर दोन गाड्या मुंबई टर्निमलवर येणार आहेत. त्यातील एक गाडी दुसऱ्या मार्गावर वळविण्या आली आहे.

ट्विट

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता विमानसेवेवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन काळात आगोदच विमानसेवा बंद होती. लॉकडाऊन पाचमध्ये नियमांना काहीशी शिथिलता मिळाल्याने मर्यादित प्रमाणात विमानोड्डाण सुरु झाले होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळाचा धोका विचारात घेऊन विमान उड्डानेही मर्यादित केली आहे. सुरुवातील आज दिवसभरात केवळ 13 विमाने उड्डाण करणार अशी माहिती होती. मात्र, प्रसारमाध्यमांनी नुकत्याच दिलेल्या वृत्तानुसार 13 पेक्षाही कमी विमानांना उड्डाण करण्यास परवानगी असल्याचे समजते. मात्र, त्याबाबत अधिकृतरित्या समजू शकले नाही.