Cyclone Nisarga Update: निसर्ग चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात दरम्यान हरिहरेश्वर, दमन येथून 3 जूनला दुपारनंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे धडकण्याची शक्यता- आयएमडी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक संकट येऊन उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) धोका असल्याने आता महाराष्ट्र किनारपट्टीला सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे

Cyclone Nisarga Update: निसर्ग चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात दरम्यान हरिहरेश्वर, दमन येथून 3 जूनला दुपारनंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे धडकण्याची शक्यता- आयएमडी
Cyclone | Image Used For Representational Purpose| Photo Credits: Wiki Commons.com

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबरोबरच महाराष्ट्रासमोर आता आणखी एक संकट येऊन उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) धोका असल्याने आता महाराष्ट्र किनारपट्टीला सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यातच निसर्ग चक्रीवादळ 100 ते 110 वाऱ्याच्या वेगाने उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात दरम्यान हरिहरेश्वर, दमन येथून 3 जूनला दुपारनंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे  धडकण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. ज्या बोटी अद्याप देखील समुद्रात आहेत त्यांना माघारी किनाऱ्यावर बोलवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

कोरोना विषाणू वाढत्या प्रादुर्भावासोबतच महाराष्ट्रासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर निसर्ग चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 3 जून म्हणजे उद्या पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते. राज्यात वादळानंतर मोठ्या आकाराचे वृक्ष तोडण्यासाठी लागणारी सर्व मशिनरी, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व सामग्री सहित येथील आज समुद्र किनारपट्टीची पाहणी करणार आहे. दरम्यान, 3 तारखेला या महाराष्ट्र किनारपट्टीवर येणाऱ्या वादळामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. हे देखील वाचा-Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत संचारबंदी लागू; नागरिकांना समुद्रकिनारपट्टीवर जाण्यास बंदी

ट्वीट-

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान सांगण्यात आले आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून त्यामुले खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किनाऱ्याला आदळतील. तसेच काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2020 09:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).