अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळाचा (Nisarga Cyclone) धोका असल्याने आता महाराष्ट्र किनारपट्टीला सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाकडून देखील काळजी घेतली जात आहे. ज्या बोटी अद्याप देखील समुद्रात आहेत त्यांना माघारी किनाऱ्यावर बोलवण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी (Mumbai) कलम 144 (Section 144) अंतर्गत संचारबंदी कायदा लागून केला आहे. आज मध्यरात्रीपासून ते उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत नागरिकांना समुद्रकिनारपट्टीवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रासह गुजरात राज्यावर असलेले निसर्ग चक्रीवादळाचे संकट 3 जून पर्यंत किनारपट्टीवर धडक देईल अशी शक्यता आहे. या वादळाच्या संभाव्य धोक्याला लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार तर्फे सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणू वाढत्या प्रादुर्भावासोबतच महाराष्ट्रासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर निसर्ग चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ 3 जून म्हणजे उद्या पश्चिम किनारपट्टी भागावर धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्र किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत -3, राजगड- 4, पालघर- 2, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबईत प्रत्येकी एक अशा संपूर्ण महाराष्ट्रात एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्यात वादळानंतर मोठ्या आकाराचे वृक्ष तोडण्यासाठी लागणारी सर्व मशिनरी, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व सामग्री सहित येथील आज समुद्र किनारपट्टीची पाहणी करणार आहे. हे देखील वाचा- High Tide In Mumbai: मुंबईतील समुद्रात आज रात्री 9.06 मिनिटांनी उसळणार उंच लाटा, येथे पहा वेळापत्रक
एएनआयचे ट्वीट-
Mumbai: The prohibitory orders u/s 144 of CrPC restricting any presence or movement of persons in public places along the coast like beaches, promenades, parks to remain in effect from midnight today till 12 noon tomorrow
— ANI (@ANI) June 2, 2020
महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान सांगण्यात आले आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून त्यामुले खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किनाऱ्याला आदळतील. तसेच काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.