Mumbai High Tide: महाराष्ट्रासह गुजरातवर निसर्ग चक्रीवादळचा (Nisarga Cyclone) धोका बसणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निसर्ग चक्रीवादळ पुढील काही तासात रौद्र रुप धारण करणार आहे. त्यामुळे नागरिकांसह एनडीआरएफच्या तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच मच्छिमारांना सुद्धा समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहेत. याच दरम्यान आता मुंबईतील समुद्रात आज रात्री 9 वाजून 06 मिनिटांनी उंच लाटा उसळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचसोबत Low Tide मुंबईत मध्यरात्री 3.35 वाजता होणार आहे.(Cyclone Nisarga in Mumbai: निसर्ग चक्रीवादळा दरम्यान काळजी घेण्यासाठी काही सुरक्षितता उपाय; BMC ने जारी केली DOs आणि DONTs ची यादी, See List)
यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रात 2 किंवा 3 जूनला पाऊस दाखल होईल असे ही सांगण्यात आले होते. तर जून महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी पहायला मिळाली. तर समुद्रात लाटा उसळण्याबाबत अधिक माहिती देत असे सांगण्यात आले आहे की, 24 मे रोजी height:4.51m 14.8ft उंच लाट उसळली होती. त्यानंतर आता 6 जूनला height:4.86m 15.9ft उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तर जून महिन्यात मुंबईतील समुद्रात किती वेळा उंच लाटा उसळणार याबाबतचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
दरम्यान, महाराष्ट्र किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत -3, राजगड- 4, पालघर- 2, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नवी मुंबईत प्रत्येकी एक अशा संपूर्ण महाराष्ट्रात एनडीआरएफच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचसोबत सध्या कोरोना व्हायरसचे सुद्धा राज्यावर आल्याने लॉकडाऊनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. तसेच पावसाळ्याच्या दिवसात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.