भारताच्या पश्चिम किनारपट्टीला उद्या (3 जून) दिवशी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. दरम्यान IMD च्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दक्षिणेकडील भागाला निसर्ग चक्रीवादळाचा धोका असल्याने मुंबई (Mumbai), रायगड (Raigad), पालघर (Palghar), वलसाड (Valsad), नवसारी(Navsari), सुरत(Surat)भागात नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान या चक्रीवादळामध्ये वार्याचा वेग हा 100-110 kmph ते 120kmph पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्रात 10आणि गुजरातमध्ये 11 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
निसर्ग चक्रीवादळाचा धोका कोणकोणत्या भागांना?
महाराष्ट्रामध्ये समुद्र किनारी असणार्या सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, वसई,पेण, मुंबई, पालघर या भागांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात मुंबईपासून सुमारे 480 किमी लांब आहे. त्यामुळे लॅन्डफॉल दरम्यान उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. Nisarga Cyclone च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात 3 जूनला पहाटे 2 पासून 48 तास संचारबंदी.
गुजरातमध्ये सुरत, नवसारी, भावनगर, वलसाड, दांग, भरूच इथे निसर्ग चक्रीवादळाचा धोका आहे. अतिमुसळधार पावसाचा अंदाज असल्याने पाणी साचल्याने झाडांचं नुकसान, टेलिफोन लाईनमध्ये बिघाड, इलेक्ट्रिक पोल्समध्ये पुढील 2 दिवस बिघाड राहण्याची शक्यता आहे. Nisarga Cyclone Tracker: अरबी समुद्रात 3 जून पर्यंत तीव्र होणार चक्रीवादळ; पहा 'निसर्ग' चक्रीवादळाच्या प्रवासाच्या प्रत्येक दिवसाचे अंदाज.
निसर्ग चक्रीवादळाचा कसा असेल प्रवास?
निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये काय नुकसान होऊ शकतं?
- वार्याचा वेग खूप असेल तर कौलारू घरांना धोका आहे. कच्च्या घरांची छप्परं उडून जाऊ शकतात. पत्रा जोडलेला नसेल तर तो उडून जाऊ शकतो.
- फोन लाईन्स किंवा इतर संवादाच्या यंत्रणेच्या लाईनमध्ये बिघाड होऊ शकतो.
- कच्छ मध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. सखल भागामध्ये पाणी भरू शकतं.
- पपई, केळीच्या झाडांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा अंदाज
— India Met. Dept. (@Indiametdept) June 2, 2020
महाराष्ट्र आणि गुजरातला धडकणार्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लॅन्डाफॉल होणार्या भागामध्ये सुरक्षेचे सारे उपाय करण्यात आले आहेत. दरम्यान पावसाचा देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या हे वादळ संध्याकाळच्या सुमारास धडकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.