Bagad Yatra (Photo Credit: Twitter)

साताऱ्याच्या (Satara) बावधन (Bavadhan) येथे कोरोनाचे (Coronavirus) निर्बंध पायदळी तुडवून बगाड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे बावधन गावावर नवे संकट उद्धवले आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या अनेक ग्रामस्थांना कोरोनाची लागण झाली होती. यातच या यात्रेला उपस्थित असणाऱ्या अनेक पोलीस कर्मचारी कोरोनाच्या जाळ्यात अडकल्याची महिती समोर आली आहे. यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. महत्वाचे म्हणजे, बगाड यात्रेमुळे कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आता 75 वर जाऊन पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बगाड यात्रेत सहभागी झालेल्या 61 ग्रामस्थांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर याच यात्रेला उपस्थित असलेल्या एकूण 11 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. यात 2 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. वाई तालुक्यातील बावधनची बगाड यात्रा ही महाराष्ट्रात सर्वात मोठी बगाड यात्रा समजली जाते. यात्रेदरम्यान झालेल्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी 83 जणांवर अटकेची कारवाई देखील केली होती. हे देखील वाचा- Vasai: गुढीपाडव्याच्या दिवशी वसईवर शोककळा; ऑक्सिजनच्या अभावी तब्बल 10 कोरोना विषाणू रुग्णांचा मृत्यू

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार संवाद साधणारे उद्धव ठाकरे आज काय घोषणा करतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.