Covid 19 Second Wave: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 'Happy Hypoxia' रुग्णांचे प्रमाण वाढले
Oximeter | Representational Image (Photo Credits: pixabay)

राज्यभरात कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची दुसरी लाट उच्च पातळीवर आहे. या आधीच्या लाटेच्या तुलनेत या वेळी कोरोना व्हायरस संसर्ग होण्याचे प्रमाण तरुणाईतही वाढले आहे. प्रामुख्याने 0 ते 25 वयोगटातील व्यक्तीलागी कोविड 19 ( COVID 19) विषाणुचा संसर्ग होताना दिसत आहे. दरम्यान, दुसऱ्या लाटेत 'हॅप्पी हायपॉक्सिया' (Happy Hypoxia) रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणवर वाढत असल्याचे पुढे आले आहे. ज्या तरुणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे त्यांमध्ये फुफ्फुसातील संक्रमण आणि 'हॅपी हायपोक्सिया' ग्रस्तांचे प्रमाण बरेच मोठे आहे.

'हॅप्पी हायपॉक्सिया' म्हणजे काय?

सर्वसामान्यपणे एखाद्या व्यक्तीला जर कोरोना संक्रमण अधिक प्रमाणात असेल किंवा नुकताच कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर त्यास श्वसनास त्रास जाणवतो. शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने आणि फुफ्पुसात संसर्ग असल्याने अशा प्रकारचा त्रास संभवतो. मात्र, काही रुग्णांमध्ये त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊनही त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत नाही. इतकेच नव्हे तर असे रुग्ण आपली दैनंदिन कामेही करत असतात. रुग्ण एकदम सामान्य दिसतो. म्हणजे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने त्यांचे काही आडत नाही. अशा लोकांना डॉक्टर 'हॅप्पी हायपॉक्सिया' (Happy Hypoxia) ग्रस्त रुग्ण म्हणतात.

निरोगी व्यक्तीच्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण 95% असते. परंतू, एखाद व्यक्ती काही आजाराने ग्रस्त असेल तर त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण 40% पर्यंत कमी होऊ शकते. अशा वेळी रुग्णाला ऑक्सिजन बेडची आवश्यकता असते. त्यासोबतच त्याला गंभीर धोकाही निर्माण होऊ शकतो. (हेही वाचा, Peepal Leaf Benefits: पिंपळाच्या पानांचा रस आहे आरोग्यासाठी फायदेशीर आहे; याने हृदय आणि फुफ्फुस राहिल स्वस्थ )

महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यात'हॅप्पी हायपॉक्सिया रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. इतकेच नव्हे तर उर्वरीत महाराष्ट्रातही  'हॅप्पी हायपॉक्सिया रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी कोरोना संसर्गाची इतर लक्षणे दिसू लागताच तातडीने शरीरातील ऑक्सिजनची तपासणी करुन घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टर देतात.