Coronavirus Outbreak (Photo Credits: Unsplash)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगभरात थैमान घातला आहे. आता भारतातही कोरोना विषाणूचे रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण भारतात संचारबंदी घोषीत करण्यात आली होती. दरम्यान, अत्यावश्यक सेवा (Essential Services) वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, या कठिण परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी अनेकजण रात्रीचा दिवस करीत आहेत. एवढेच नव्हेतर, नागरिकांची तपासणी करण्यासाठी आरोग्य वैद्यकीय कर्मचारी काही भागात जात आहेत. यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ लागली आहेत. यातच कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन सातारा (Satara) जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी आणि आवश्यक सेवा देण्यासाठी बाहेर फिरणाऱ्या नागरीकांनी मास्क चेहऱ्यावर परिधान करणे बंधनकारक आहे, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी संपूर्ण भारतात संचारबंदी घोषीत करण्यात आली आहे. दरम्यान, अत्यावश्यक वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. या कठीण परिस्थितीत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस कर्मचारी, आपला जीव धोक्यात टाकून नागरिकांची सेवा करत आहेत. दरम्यान, कोणात्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नाही म्हणून सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महत्वाची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनी बाहेर फिरताना तोंडावर मास्क लावणे गरजेचे आहे, असा आदेश त्यांनी दिला आहे. हे देखील वाचा-  Coronavirus: पुण्यातील वैद्यकिय आणि अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचाऱ्यांना 1 कोटीचा विमा, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

ट्वीट-

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 15 लाख 96 हजार 496 वर पोहचली आहे. यांपैकी 95 हजार 505 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 54 हजार 6 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 6 हजार 761 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 199 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 516 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1380 वर पोहचली आहे. यात 72 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 117 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.