पुणे महापौर मुरलीधर मोहोळ (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहणार आहेत. दुसऱ्या बाजूला वैद्यकिय कर्मचारी कोरोनाबाधित रुग्णांवर दिवसरात्र उपचार करत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणारे कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर युद्धपातळीवर काम करत आहेत. त्यामुळे आता पुणे (Pune) येथील वैद्यकिय आणि अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचाऱ्यांना कोटीचा विमा कव्हर देण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी दिली आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर प्रत्येक राज्यातील स्थानिक सरकारकडून विविध उपाय योजना केल्या जात आहेत.

पुण्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत नसली तरीही वैद्यकिय कर्मचारी त्यांच्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. तसेच रस्त्यावरील कर्मचारी रस्त्यांची साफसफाई करताना दिसून येत आहेत. ऐवढेच नाही तर अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचाऱ्यांचे ही यामध्ये मोठे योगदान पहायला मिळत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी 1 कोटीच्या विम्याची घोषणा करण्यात आली आहे.(COVID-19: अहमदनगर येथील 27 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू) 

तर शुक्रवारी एकाच कुटुंबातील 5 कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोरोनाबाधितांचा आकडा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तर मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 700 च्या पार गेला आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असून दिवसेंदिवस महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे.