प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे अधिक वेगाने संपूर्ण राज्यात पसरू लागल्याने सर्वत्र भितीजनक वातवरण निर्माण झाले आहेत. दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांत वाढ होऊ लागल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यातच अहमदनगर (Ahmednagar) येथील कोरोनाबाधीत रुग्णांचा पुण्यातील (Pune) ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) मृत्यू झाला आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने आता भारतातही घुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही.

अहमदनगर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी एक 27 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. या रुग्णाला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खबरदारी म्हणून या रुग्णाच्या कुटुंबातील काहीजणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले होते. मात्र, ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 15 लाख 96 हजार 496 वर पोहचली आहे. यांपैकी 95 हजार 505 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 लाख 54 हजार 6 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतही आता कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 6 हजार 412 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 199 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 503 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 1380 वर पोहचली आहे. यात 72 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 117 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे. हे देखील वाचा-  महाराष्ट्र: वाधवान परिवाराने लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन केल्याने कुटुंबासह 23 जणांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल

एएनआयचे ट्वीट-

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.