Coronavirus: कोरोनाने पती गेला, विरहाने व्याकूळ पत्नीची 18 महिन्यांच्या मुलीसोबत आत्महत्या; पुणे येथील शिक्षक दाम्पत्य उद्ध्वस्त
Suicide (pic credit: Wikimedia Commons)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाने पतीचे निधन झाल्यानंतर विरहाने व्याकूळ पत्नीने 18 महिन्यांच्या मुलासोबत आत्महत्या (Suicide) केली आहे. पती-पत्नी दोघेही पुणे (Pune) येथे नोकरीस होते. शीतल राजाभाऊ जाधवर आणि शांभवी अशी मृत मायलेकींची नावं आहेत. दोघींनी बीड (Beed) जिल्ह्यात केज तालुक्यातील बानेगाव येथे दोघींनी विहीरत उडी घेऊन आत्महत्या केली. घडल्या प्रकारामुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होते आहे.आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीचे एक महिन्यापूर्वी कोरोनाने निधन झाले होते. पतीचे निधन झाल्यानंर ही महिला आपल्या मुलीसह माहेरी आली होती.

दरम्यान, विरार येथील एका महिलेनेही अशाच प्रकारे आपले जीवन संपवल्याची घटना घडली होती. 24 वर्षीय पतीचे आजारपणामुळे निधन झाल्यानंतर 22 वर्षीय पत्नीने आत्महत्या करत जीवन संपवले होते. ही घटना विरार पूर्व परिसरात असलेल्या मनवेलपाडा येथील दादूस क्लासिक अपार्टमेंट इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर 302 क्रमांकाच्या खोलीत घडली होती. पतीचे नाव नरेंद्रसिंग परमार (वय 24 वर्ष) तर संतोषकुवर नरेंद्र सिंग परमार (वय 22 वर्ष) असे पत्नीचे नाव होते. हे दाम्पत्य मूळचे राजस्थानचे होते. (हेही वाचा, Mira Road Shocker: आई ने पोटच्या दोन Differently Abled Children चा जीव घेत स्वतः केली आत्महत्या)

कोरोना काळात नैराश्येने आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे वाढले आहे. अनेक घटनांमध्ये पती किंवा पत्नी यापैकी एका जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्याने आत्महत्या करण्याची घटना पुढे आल्या आहेत. नागरिकांमधील ताण तणावही प्रचंड वाढले आहेत. अनेकांच्या हाताला काम नाही. वाढती बेकारी, बेरोजगारी आणि महागाई त्यातच आरोग्याचे प्रश्न नागरिकांसमोर जीवनमरणाची लढाई निर्माण करत आहेत.