Mira Road Shocker: आई ने पोटच्या दोन Differently Abled Children चा जीव घेत स्वतः केली आत्महत्या
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai) मध्ये एका 47 वर्षीय महिलेने पोटच्या दोन मुलांच्या जीव घेऊन आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. तिची दोन्ही मुलं ही Differently Abled Children होती. ही घटना मीरा रोड (Mira Road) परिसरातील काल, मंगळवार (7 सप्टेंबर) ची आहे. पोलिसांनी मिड डे ला दिलेल्या माहितीनुसार, नसीन बानो ही नरेंद्र पार्क येथील रहिवासी आहे तिने 21 वर्षीय मुलगी सदाद नाझ आणि 13 वर्षीय मोहम्मद आर्ष यांना झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर स्वतः देखील आयुष्य संपवलं.

पोलिसांना बानो यांच्या शेजार्‍यांनी दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं की बानो आणि तिचा नवरा वर्षभरापासून विभक्त झाला आहे. नंतर मुलांचा सांभाळ करू न शकल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललं असावं. घटस्फोटानंतर बानो तिच्या वयोवृद्ध वडिलांसोबत नया नगर, मीरा रोड मध्ये राहत होती. घटस्फोटानंतर ती नैराश्याच्या गर्तेत गेली होती. असे देखील शेजार्‍यांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी बानो यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला आणि नातवंडांना बेशुद्ध अवस्थेमध्ये पाहिलं. त्यानंतर तिघांनाही त्यांनी हॉस्पिटल मध्ये हलवलं. मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये आणताच मृत घोषित करण्यात आले. नक्की वाचा: Bhopal: पोटच्या मुलांचा गळा चिरून आई-वडिलांनी केले विष प्राशन, पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती उघड .

पोलिसांनी यानंतर मर्डर आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस ऑफिसरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे मृतदेह पोस्ट मार्टम साठी पाठवण्यात आले असून त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं कारण समजेल असं सांगितलं आहे. मुलगी आणि दोन्ही नातवंडांच्या मृत्यूचा धक्का बानोच्या वडिलांना बसला आहे.