देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारीने (Coronavirus) थैमान घातला आहे. कोरोनामुळे देशातील उद्योगधंदे, व्यवसाय आणि वाहतुकीसह बऱ्याच गोष्टी ठप्प झाल्या आहेत. ज्यामुळे अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. याच बेरोजगारीच्या संकाटाला वैतागून अनेकांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. यातच मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) भोपाळ (Bhopal) येथे आर्थिक अडचणीत सापडलेल्या निराश झालेल्या एका व्यक्तीने आपल्या दोन मुलांचा गळा चिरून आपल्या पत्नीसह आत्महत्या केली आहे. यात पतीसह मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, पत्नी आणि मुलगी मृत्यूशी झुंज देत आहेत.
रवी ठाकरे आपली पत्नी रंजना ठाकरे, मुलगा चिराग (वय,16) आणि मुलगी गुंजन (वय, 14) यांच्यासह मल्टी सहारा इस्टेट येथे राहत होते. रवी ठाकरे हे इंजिनिअर असून त्यांची पत्नी ब्युटी पार्लर चालवत होती. परंतु, लॉकडाऊनमध्ये रवी यांची नोकरी गेली होती. तर, रंजनाचे ब्युटी पार्लर देखील बंद पडले होते. याच नैराश्यातून रवी ठाकरे आणि रंजना यांनी चिराग आणि गुंजन झोपेत असताना त्यांचा गळा चिरला आणि स्वत:ही विष प्राशन केले. दरम्यान, पोलिसांनी सर्वांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता रवी आणि चिराग यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. गुंजन आणि रंजना यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Pune Gangrape: पुण्यातील धक्कादायक घटना! 25 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार, चौघांना अटक
याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आस्कमित मृत्यूची नोंद केली आहे. आर्थिक परिस्थितीला कंटाळून दाम्पत्याने धक्कादायक कृत्य केले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.