
देशात महिलांवर होणारे अत्याचार आणि बलात्काराचे सत्र सुरुच आहेत. देशातील विविध कोपऱ्यातून दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. अशातच पुण्यातून (Pune) सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. पुण्याच्या जनता वसाहत परिसरात (Janta Vasahat) एका 25 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पीडिताला घरी सोडण्याचे सांगत आरोपींनी घृणास्पद कृत्य केले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी काल सांयकाळी स्वारगेटवरून कात्रजला चालली होती. त्यावेळी एका आरोपीने तिला घरी सोडण्याचे खोटे सांगून जनता वसाहतीत घेऊन गेला. तिथे अगोदरच एक आरोपी होता. ती महिला घरात बसल्यावर काही वेळाने आणखी दोन आरोपी घरात शिरले. त्यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हे देखील वाचा- Mumbai Rape Case: पाठीच्या दुखण्यावर उपचार करण्याच्या बहाण्याने मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
पीडित तरुणी मतिमंद असल्याची माहिती मिळत आहे. याचाच गैरफायदा घेऊन आरोपींनी पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आहे. एका खोलीतून पीडित मुलीचा रडण्याचा आवाज आल्यानंतर परिसरातील महिलेने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता धक्कादायक माहिती समोर आली. श्रीकांत सरोदे, आदित्य पवार, दुर्वेश जाधव आणि आशिष उर्फ राड्या मोहिते असे अत्याचार करणाऱ्या चार नराधमांची नावे आहेत.