महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसगणिक वाढत चालला आहे. तर मुंबई आणि ठाण्यानंतर आता कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) येथे कोरोना संक्रमितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेल्याची माहिती समोर आली आहे. तर ठाण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 11 हजारांच्या पार गेला आहे. केडीएमसी मध्ये नव्याने 471 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आकडा 10,351 वर पोहचला आहे. तसेच सात जणांचा बळी गेल्याने एकूण आकडा 158 वर पोहचला आहे.(Coronavirus in Mumbai: मुंबई शहरात आज 1,381 कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 87,513 वर)
कल्याण-डोंबिवलीत मार्च महिन्यात फक्त 14 कोरोनाबाधित रुग्ण होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमितांचा आकडा 1 हजारांवर पोहचला. मे महिन्यात आकडा 1 हजारांच्या पार गेल्यानंतर जुन महिन्यात कोरोनाचा आकडा 5,500 वर पोहचला. मात्र गेल्या आठ दिवसात आणखी 3,776 नव्याने कोरोनाच्या रुग्णांची भर पड्ल्याची माहिती दिली आहे. कल्याण-डोंबिवलीत दरदिवसाला 700-1000 स्वॅब टेस्टिंग करण्यात येते.(Maharashtra May Consider Reopening Restaurants & Gyms: महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार रेस्टॉरंट्स आणि जिम; याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची राजेश टोपे यांची माहिती)
तसेच नवी मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 8,279 वर पोहचला असून 207 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तसेच 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आकडा 269 वर पोहचला आहे. त्याचसोबत 4931 जणांची प्रकृती सुधारली आहे. मीरा-भायंदर येथे सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजारांवर पोहचण्याची शक्यता आहे. बुधवारी आणखी 175 कोरोनाच्या रुग्णांची भर पडल्याने आकडा 4808 वर पोहचला आहे. उपनगरपालिका आयुक्त यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाच्या एकूण परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास आकडा 223724 वर पोहचला असून 9448 जणांचा बळी गेला आहे. तसेच 91065 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. तर 123192 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली आहे. तर राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार आता 8 जुलै पासून राज्यातील हॉटेल्स, लॉज यांना त्यांचे व्यवसाय सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच येत्या काळात जिम सुद्धा सुरु करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.