Coronavirus in Mumbai: मुंबई शहरात आज 1,381 कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 87,513 वर
Coronavirus scanning at an airport (Photo Credit: PTI)

मुंबई (Mumbai) शहरात आज दिवसभरात 1,381 कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. अशाप्रकारे मुंबई शहरातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा आकडा 87,513 वर पोहोचला आहे. आज शहरात 1,101 रुग्ण बरे झाले आहेत, यासह आतापर्यंत शहरात 59,238 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या शहरात उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 23,214 इतकी आहे. मुंबईत कोरोनामुळे आज 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे व यामुळे एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 5,061 इतकी आहे. आज शहरात 897 कोरोना संशयित रुग्णांची भरती करण्यात आली.

आजचे 62 मृत्यू गेल्या 48 तासांमध्ये झाले आहेत. यातील 59 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 49 रुग्ण पुरुष व 13 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 5 जणांचे वय 40 वर्षा खाली होते,  41 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 16 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 68 टक्के झाला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात लवकरच सुरु होणार रेस्टॉरंट्स आणि जिम; याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची राजेश टोपे यांची माहिती)

पहा ट्वीट -

1 जुलै ते 7 जुलै पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 1.54 टक्के इतका आहे. 7 जुलै 2020 पर्यंत शहरात झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 3, 68, 603 आहेत, तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा 45 दिवस आहे. मुंबईमध्ये आता कोणत्याही नागरिकास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोरोना चाचणी करून घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासह कोविड संशयित व लक्षणे असलेल्या तसेच अति जोखमीचे व्यक्ति ज्यांना हॉस्पिलायझेशनची गरज आहे अश्या व्यक्तींची, रॉपिड अॅटीजेन चाचणी केली जाऊ शकते. यासाठी रुग्णालय NABH मान्यता प्राप्त असावे. ही चाचणी ICMR च्या मार्गदर्शक सुचनेनुसार ICMR  मान्यता प्राप्त असलेल्या प्रयोगशाळेमधून करावी.