Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. जवळपास प्रत्येक जिल्ह्यात कोविड 19 बाधित (COVID-19) रुग्ण आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती झाली हे माहिती आहे काय? कोरोना विषाणू प्रतिबंध आणि सद्यास्थितीत असलेला उपाय म्हणजे लॉकडाऊन(Lockdown). राज्यात संपत 14 एप्रिलला संपणारा लॉकडाऊन आता 30 एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. आवश्यक ते खबरदारीचे सर्व उपाय करुनही राज्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्ण वाढत आहेत. याला नागरिकांकडून विविध ठिकाणी केली जाणारी गर्दी कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी.

दरम्यान, महाराष्ट्रासोबत देशातील कोरोना व्हायरस रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढते आहे. देशभरामध्ये गेल्या 24 तासात कोरना व्हायरसचे 909 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 8356 इतकी झाली आहे. तर, गेल्या 24 तासात कोरोना बाधित 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. COVID-19 मुळे मृत्यू झालेल्या देशातील रुग्णांचा आकडा 273 इतका आहे. (हेही वाचा, Coronavirus Update: महाराष्ट्रात आढळले 187 नवे रुग्ण; राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1761वर)

जकोविड-19 महाराष्ट्र राज्याची जिल्हा/मनपा निहाय सध्या स्थिती

(*आकडेवारी दि. 11 एप्रिल 2020, सायं 6.00)बाधित रुग्ण

मृत्यू

अ.क्र. Pजिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 1146 76
2 ठाणे 6 0
3 ठाणे मनपा 29 3
4 नवी मुंबई मनपा 36 2
5 कल्याण डोंबिवली मनपा 35 2
6 उल्हासनगर मनपा 1 0
7 भिवंडी निजामपूर मनपा 0 0
8 मीरा भाईंदर 36 1
9 पालघर 4 1
10 वसई विरार मनपा 14 3
11 रायगड 0 0
12 पनवेल मनपा 7 1
  ठाणे मंडळ एकूण 1314 89
1 नाशिक 1 0
2 नाशिक मनपा 1 0
3 मालेगाव मनपा 5 1
4 अहमदनगर 9 0
5 अहमदनगर मनपा 16 0
6 धुळे 0 0
7 धुळे मनपा 0 0
8 जळगाव 1 0
9 जळगाव मनपा 1 1
10 नंदुरबार 0 0
  नाशिक मंडळ एकूण 43 4
1 पुणे 7 0
2 पुणे मनपा 228 27
3 पिंपरी-चिंचवड मनपा 22 0
4 सोलापूर 0 0
5 सोलापूर मनपा 0 0
6 सातारा 6 2
  पुणे मंडळ एकुण 263 29
1 कोल्हापूर 1 0
2 कोल्हापूर मनपा 5 0
3 सांगली 26 0
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 0 0
5 सिंधुदुर्ग 1 0
6 रत्नागिरी 5 1
  कोल्हापूर मंडळ एकुण 38 1
1 औरंगाबाद 3 0
2 औरंगाबाद मनपा 16 1
3 जालना 1 0
4 हिंगोली 1 0
5 परभणी 0 0
6 परभणी मनपा 0 0
  औरंगाबाद मंडळ एकूण 21 1
1 लातूर 0 0
2 लातूर मनपा 8 0
3 उस्मानाबाद 4 0
5 बीड 1 0
6 नांदेड 0 0
7 नांदेड मनपा 0 0
  लातूर मंडळ एकूण 13 0
1 अकोला 0 0
2 अकोला मनपा 12 0
3 अमरावती 0 0
4 अमवरावती मनपा 4 1
5 यवतमाळ 4 0
6 बुलढाणा 13 1
7 वाशीम 1 0
  अकोला मंडळ एकूण 34 2
1 नागपूर 0 0
2 नागपूर मनपा 25 1
3 वर्धा 0 0
4 भंडारा 0 0
5 गोंदिया 1 0
6 चंद्रपूर 0 0
7 चंद्रपूर मनपा 0 0
8 गडचिरोली 0 0
  नागपूर मंडळ एकूण 26 1
1 इतर राज्य 9 0
  एकूण 1761 127

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा एकूण आकडा 8356 इतका आहे. त्यात 716 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात कोरोना व्हायरस बाबत उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 7367 इतकी आहे. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 273 इतकी आहे.