Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे रायगड मधील माथेरान, किल्ले आणि समुद्र किनारे नागरिकांसाठी बंद
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

राज्यात वाढता कोरोना व्हायरसाच प्रादुर्भाव पाहता नागरिकांना गर्दीचा ठिकाणी जाऊ नये असे सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्यातील शाळा-महाविद्यालय, स्विमिंगपूल, जिमसह अन्य गोष्टीसुद्धा बंद ठेवण्यात यावेत असे आदेश जाहीर केले आहेत. याच पार्श्वभुमीवर रायगड मधील पर्यटकांना फिरण्यासाठी प्रसिद्ध असलेले माथेरान, किल्ले आणि समुद्र किनारे 31 मार्च बंद करण्यात आले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 49 वर पोहचला आहे.मुंबईपासून 90 किमी अंतरावर असलेले आणि सह्याद्रीच्या रांगेतील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओखळले जाणारे माथेरान नागरिकांसाठी मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोनाची राज्यातील परिस्थिती पाहता या संबंधित आदेश दिले आहेत. तसेच हॉटेल्सला सुद्धा बंद ठेवण्यात येणार आहेत. नगरपरिषदेच्या अध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हिल स्टेशन वरील पर्यटकांवर बंदी घालावी असे म्हटले आहे.(मुंबई: Coronavirus च्या भीतीने दादर, माटुंगा, माहीम, धारावी येथे एक दिवस आड सुरु राहणार दुकाने; गर्दी रोखण्यासाठी BMC चा नवा उपाय) 

रायगड येथे विविध किल्ले आणि समुद्र किनारे आहेत. त्यामुळे नागरिक विकेन्ड्सच्या सुट्टीनिमित्त येथील किल्ले आणि समुद्र किनारी सुट्टी घालवण्यासाठी येतात. मात्र कोरोनाची राज्यातील परिस्थिती पाहता ते आता 31 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. त्याचसोबत समुद्र किनारी कलम 144 सुद्धा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी या आदेशाचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट मालकांनी सुद्धा 15 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात येतील असा निर्णय घेतला आहे. नुकसानीपेक्षा कोरोनामुळे नागरिकांचे जीवाला धोका उद्भवणार नाही याची काळजी त्यांनी घेतली आहे.

बईतील 22 वर्षीय महिलेची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही सदर महिला युके येथून भारतात आली आहे. तसेच उल्हासनगर येथील अजून एका 49 वर्षीय महिलेची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला दुबई येथून परतल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. तसेच मुंबईतील विलगीकरण कक्षात सुद्धा वाढ करण्यात येत आहेl.