कोरोना (Coronavirus) हा वेगाने पसरत जाणारा विषाणू रोखण्यासाठी सरकारतर्फे सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा- कॉलेज, हॉटेल्स, बार, मॉल्स, मंदिरे, पर्यटन स्थळे सर्व काही बंद ठेवण्यात आले आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू साठी दुकाने सुरु ठेवण्याला काही पर्याय सापडत नव्हता, अखेरीस आता मुंबई महानगरपालिकेने (BMC) यावर सुद्धा नामी उपाय शोधून काढला आहे. यापुढे काही दिवस मुंबईतील प्रमुख गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच दादर (Dadar) ,माहीम (Mahim) , माटुंगा (Matunga) , धारावी (Dharavi) सहित काही परिसरात Odd- Even नियमानुसार दुकाने सुरु ठेवण्यात येणार आहेत. याचा अर्थ असा की काही दिवस एक दिवस आड व्यापार केला जाईल. Coronavirus: उघड्यावर थुंकणाऱ्यांकडून तब्बल 1,07,000 हजार रुपयांचा दंड महापालिकेकडून वसूल
वास्तविक इतर सुविधांप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने जर का पूर्णपणे बंद केली तर त्या आधीच भीतीने काही नागरिक साठेबाजी करून ठेवतील, शिवाय अधिक किंमत मिळवण्यासाठी काळाबाजार सुद्धा केला जाऊ शकतो, त्यामुळे हा मार्ग रास्त नव्हता यावर शेवटी किंचित बदल एक दिवस आड दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती देणारी एक पत्रक देखील साध्य ट्विटर वर पाहायला मिळतेय, या पत्रकात बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, अशा वेळापत्रकात दुकाने बंद असणार आहेत.. जाणून घ्या..
सोमवार, बुधवार, शुक्रवार, रविवार खालील ठिकाणी दुकाने बंद राहणार
दादर
न. चि. केळकर मार्ग (पूर्व बाजू), डिसिल्व्हा रोड, छबिलदास रोड, एस. के. बोले मार्ग (दक्षिण बाजू), सेनापती बापट रोड (कोहिनूर इन्स्टिट्यूट ते हाॅकर्स प्लाझा)
माहीम
टी. एच. कटारिया मार्ग (दक्षिण बाजू- गंगाविहार हाॅटेल ते शोभा हाॅटेल), लेडी जमशेदजी क्राॅस रोड (दर्गा गल्ली)
धारावी
90 फूट रोड (पश्चिम बाजू-60 फूट रोड ते संत रोहिदास मार्ग), आंध्र व्हॅली रोड (पश्चिम बाजू, महात्मा गांधी मार्ग (पश्चिम बाजू)
पहा ट्विट
#dadar #mahim इलाके में #odd और #even तारीख के हिसाब से दुकान रहेगी शुरू, भीड़ कम करने के लिए बीएमसी ने लिया फैसला#coronavirusindia pic.twitter.com/IDbZBLp8eq
— Mumbai Live (@MumbaiLiveNews) March 18, 2020
दरम्यान हा नियम सर्वच सेवांच्या बाबत सुद्धा लागू करण्यात आला आहे, खाजगी कंपन्यांना सुद्धा केवळ 50% कर्मचाऱ्यांना कामावर बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर मुंबईतील वाहतूक सेवा सुद्धा 50% प्रवासी क्षमतेने चालवली जाणार आहे. या नियमाचे पालन न केल्यास कलम 188 अंतर्गत संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल असेही बीएमसी कडून स्पष्ट करण्यात आले आहे.