मुंबई (Mumbai) शहरातील धारावी (Dharavi) परिसरात COVID19 बाधित रुग्णांची संख्या वाढून ती 9 वर पोहोचली आहे. यात कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या आजच्या 2 नव्या रुग्णांचाही समावेश आहे. या दोन नव्या रुग्णांपैकी एक जण हा मुकुंद झोपडपट्टी (Mukund Slum) तर दुसरा धनवाडा चाळ (Dhanwada Chawl) येथील रहिवासी आहे. महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 1020 इतकी झाली आहे. त्यात 64 मृतांचाही समावेश आहे. देशभरात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. संबंध देशाचा विचार करता कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे.
महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे जिल्ह्यात त्यानंतर सांगली आणि अहमदगर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचे अधिक रुग्ण असल्याचे पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यात आज आणखी दोन कोरोना व्हायरस बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील एक जण तर 44 वर्षे वयाचा होता. (हेही वाचा, पुणे: ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू; शहरातील Covid 19 मुळे बळींचा आकडा 10 वर)
एएनआय ट्वट
Maharashtra: Number of #COVID19 cases rises to 9 in Mumbai's Dharavi, with two more men testing positive at Mukund slum & Dhanwada Chawl. According to Union Health Ministry, total cases have surged to 1018 in the state while 64 people have succumbed to the disease.
— ANI (@ANI) April 8, 2020
दरम्यान, 773 नव्या रुग्णांसह देशातील COVID-19 बाधितांची संख्या तब्बल 5194 वर पोहोचली आहे. त्यातील 401 जणांची प्रकृती उपचारानंतर सुधारली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, आतापर्यंत कोरोना बाधित तब्बल 149 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात उपचार घेत असलेल्या कोरोना व्हायरस बाधितांची एकूण संख्या 4643 इतकी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकतीच ही ताजी माहिती दिली आहे.