देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र नागरिकांना अत्यावश्यक सेवासुविधा पुरवल्या जाणार आहेत. तरीही नागरिक सकाळच्या वेळेस भाजी खरेदी करण्यासाठी किंवा कोणते ना कोणते कारण देत घराबाहेर पडत दिसुन येत आहे. यामुळे नागरिकांकडून लॉकडाउनसह सोशल डिस्टंन्सिंगच्या नियामाचा फज्जा उडाल्याचे दिसुन येत आहे. याच पार्श्वभुमीवर आता नांदेड (Nanded) येथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे उल्लंघन नागरिकांनी केले.
नांदेड शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयाजवळ भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात जनले होते. त्यावेळी भाजी विक्रेत्यासह नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियम विसरुन गर्दी केली होती. त्यामुळे नांदेड मधील नागरिक भाजीपाला खरेदी करते वेळी बेजाबदारपणे वागत असल्याचे दिसून आले. यापूर्वी मुंबईत सुद्धा वांद्रे येथील जिओ गार्डनवर नागरिकांकडून भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहायला मिळाले होते.(नागपूर येथे सकाळच्या वेळेस भाजी खरेदी करताना नागरिकांकडून सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा)
#नांदेड शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालय परिसरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी लोकांनी अशी गर्दी केली. सोशल डिस्टन्ससिंग पालन होताना दिसत नाही.#CoronaInMaharashtra #Social_Distancing pic.twitter.com/6EaiWOOxQO
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) April 20, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती पाहता रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि अन्य वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र उपचार करत आहेत. तर गोवा येथे आता एकही कोरोनाबाधित रुग्ण नसून ते कोरोनामुक्त झाल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली होती.